Join us  

शाहिद कपूर म्हणतो ‘मी आलू सारखा?’

By admin | Published: February 27, 2017 2:36 AM

बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स आॅफिसवर अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. हे खरे असले तरी देखील या चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांच्या कामाची चांगलीच प्रशंसा केली जात आहे. रंगूनमध्ये शाहिद कपूरने साकारलेल्या नवाब मलिक या भूमिकेविषयी अभिनेता शाहिद कपूरने आपले मत व्यक्त केले आहे. शाहिद म्हणाला, ‘विशाल भारद्वाज यांच्या डिशमधील मी आलू आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या रंगून या चित्रपटातून प्रेम त्रिकोण दाखविण्यात आला आहे.’ शाहिद कपूरने यात ब्रिटीश सैन्यातील जमादार नवाब मलिक ही भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना विशाल भारद्वाज यांच्यासोबत कामाच्या अनुभवाबाबत शाहिद म्हणाला,‘ मी आलू आहे, मला कोणत्याही भाजीत तुम्ही टाकू शकता. जेव्हा विशाल सर कुकिंग करीत असतात तेव्हा मी त्यांच्यासोबत असतो. रंगून या चित्रपटाविषयी शाहिद म्हणाला, विशाल भारद्वाज या चित्रपटावर मागील सहा-सात वर्षांपासून काम करीत होते. ते चांगले लेखक आहेत. ‘हैदर’हा चित्रपट एक्सपेरीमेंटल होता, यानंतर ते एखाद्या मोठ्या विषयावर काम करू इच्छित होते. सिनेमॅटिक जे लोकांना पसंत पडेल. मलाही त्यांच्यासोबत मुख्य प्रवाहातील सिनेमात काम करायचे होते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी प्रेमकथा या विषयाचे त्यांना आकर्षण वाटले. ’