यापूर्वी रणवीरसिंहने ‘बाजीराव मस्तानी’मधील त्याचा लूक लपवण्यासाठी कॅट असलेल्या जॅकेटचा सहारा घेतला होता. अशीच वेळ शाहिदवरही आली आहे. शानदारमधील लूक लपवण्यासाठी शाहिदने चेहऱ्यावरच मफलर गुंडाळली. या चित्रपटात तो वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, हाच लूक लपवण्यासाठी त्याने मफलरचा आधार घेतला. एका कार्यक्रमातून बाहेर पडताना शाहिदने चेहऱ्यावर मफलर गुंडाळली होती. या चित्रपटात शाहिद वेडिंग प्लानरच्या भूमिकेत आहे. हैदरच्या रिलीजपूर्वीही शाहिदने हॅटच्या साहाय्याने त्याचा लूक लपवला होता.
शाहिदने लपवला चेहरा
By admin | Updated: December 22, 2014 23:10 IST