Join us

शाहरूख म्हणतोय, मराठीत काम करायला आवडेल

By admin | Updated: December 25, 2015 02:15 IST

लय भारीमध्ये रितेश देशमुखने मुख्य तर सलमान खानने गेस्ट अ‍ॅपिअरन्स आणि लवकरच भगवानदादांवर आधारित चित्रपट ‘एक अलबेला’ चित्रपटातून विद्या बालन मराठीत पदार्पण करीत असताना, अजून एक बॉलीवूड अभिनेता

लय भारीमध्ये रितेश देशमुखने मुख्य तर सलमान खानने गेस्ट अ‍ॅपिअरन्स आणि लवकरच भगवानदादांवर आधारित चित्रपट ‘एक अलबेला’ चित्रपटातून विद्या बालन मराठीत पदार्पण करीत असताना, अजून एक बॉलीवूड अभिनेता... नुसतं बॉलीवूड असं निश्चितच म्हणून चालणार नाही, बॉलीवूडमधील किंग खान शाहरूखनेही मराठीत काम करायला आवडेल, असे म्हटले आहे. याबद्दल शाहरूख खान सांगतो की, ‘मी वेळ मिळाला की, लवकरच रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारलेला लय भारी चित्रपट पाहणार आहे. मलाही मराठी चित्रपटात काम करायला निश्चितच आवडेल, पण मला फारसे नीट मराठी बोलता येत नाही, त्यामुळे एखाद्या गाण्यासाठी वगैरे मला संधी द्यावी,’ असे तो मिश्कीलपणे सांगतो. ‘पण थोडे-फार मराठी डायलॉग असतील, तर मी ते बोलू शकेन,’ असेही तो पुढे नमूद करतो.