शाहरूख खान आणि सुपरस्टार रजनीकांत या दोघांमध्ये पुढच्या वर्षी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. शाहरूखचा ‘फॅन’ आणि रजनीकांंतचा ‘काबली’ दोन्ही चित्रपट १४ एप्रिलला रिलिज होणार असे सांगण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी ‘काबली’ची शूटिंग सुरू झाली असून जानेवारी महिन्यात ती पूर्ण होईल. १४ एप्रिल रोजी तमिळ नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर ‘काबली’ प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. यामध्ये रजनीकांत एका गँगस्टरच्या रूपात दिसणार आहे. नुकतेच त्याचे पहिले पोस्टर लाँच झाले.
शाहरूख-रजनीची टक्कर?
By admin | Updated: September 27, 2015 01:55 IST