स लमान खानची बहीण अर्पिता खान हिचा लग्नसोहळा 18 नोव्हेंबरला हैदराबादला पार पडणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरला मुंबई येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. रिसेप्शनसाठी सलमानने बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांना आमंत्रण दिल्याचे समजते. त्यात शाहरुख खानच्या नावाचाही समावेश आहे. पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूड कलाकार, नेते, खेळाडू आणि उद्योगपतींच्या नावांचा समावेश आहे. शाहरुखसह अमिताभ बच्चन, आमिर खान, हृतिक रोशन, दीपिका पदुकोन आणि करिना कपूर- खान यांच्यासह या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी राहण्याची शक्यता आहे.