Join us  

शाहरुख, आमिरला पछाडत सलमान बनला नंबर एक

By admin | Published: March 21, 2017 10:41 PM

सलमान खानचा कोणताही चित्रपट असो तो बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो, त्याबरोबर नवनवीन रेकॉर्डही बनवतो.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - सलमान खानचा कोणताही चित्रपट असो तो बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो, त्याबरोबर नवनवीन रेकॉर्डही बनवतो. त्यामुळेच सर्वाधिक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे दिग्दर्शकाची रांग लागलेली असते. सर्वच स्थारावर तो आपल्या प्रतिस्पर्धी कलाकारांच्या नेहमी पुढे असतो. परंतु सलमानच्या नावावर केवळ कमाईचेच नव्हे तर टॅक्स भरण्याचाही रेकॉर्ड आहे. अक्षय कुमार, हृतिक रोशन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांना टॅक्स भरण्यात मागे टाकत त्याने याबाबतचे रेकॉर्ड स्वत:च्या नावावर नोंदविले आहे.सलमानने 2016-17 या आर्थिक वर्षात हे रेकॉर्ड स्वत:च्या नावावर नोंदविले आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सलमान खानने यावर्षी 44 कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. हा टॅक्स भरताना त्याने अक्षय कुमार, हृतिक रोशन यांच्यासह शाहरूख खान, ऐश्वर्या राय- बच्चन आणि अमिताभ बच्चन या दिग्गजांना धोबीपछाड दिली आहे. कारण आतापर्यंत हा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर असायचा. याचवर्षी नव्हे तर गेल्यावर्षीही सलमानने तब्बल 32 कोटी रुपये एवढा टॅक्स भरला होता. गेल्यावर्षी अक्षयच्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. मात्र अशातही अक्षयने यावर्षी 29 कोटी रुपये एवढा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. तो या यादीत दुस-या स्थानावर राहिला आहे. तर हृतिक रोशनने 25.5 कोटी रुपयांचा टॅक्स भरून तिसरे स्थान मिळवले आहे. मात्र या यादीत सर्वाधिक धक्कादायक एंट्री राहिली ती कॉमेडियन कपिल शर्माची. कपिलने यावर्षी तब्बल 23 कोटी रुपये एवढा टॅक्स भरला आहे. गेल्यावर्षी त्याने केवळ 7 कोटी रुपये टॅक्स भरला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कपिलच्या कमाईत 206 टक्क्यांची ग्रोथ बघावयास मिळाली. कपिलप्रमाणेच रणबीर कपूर याने 16 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आमिर खान या यादीत खूपच खालच्या स्थानावर आहे. त्याने केवळ 14 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.