बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि ‘बार्बी गर्ल’ कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. रोहितचा हा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ या सुपरहिट हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. २00५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ‘ब्रॅड पीट’ आणि ‘अँजेलिना जोली’ मुख्य भूमिकेत होते. रोहितच्या चित्रपटात या भूमिका शाहरुख आणि कॅट साकारणार असल्याची चर्चा आहे. सध्या रोहित ‘सिंघम २’ मध्ये बिझी आहे.