‘देवदास’, ‘मोहब्बते’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेली शाहरुख-ऐश्वर्या रॉय यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा दिग्दर्शक रोहित शेट्टी शाहरुखसोबत एका नव्या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. ऑगस्टमध्ये रोहितने शाहरुखसोबत एक चित्रपट करीत असल्याची बातमी दिली होती; पण त्यावेळी चित्रपटातील हिरोईनची निवड करण्यात आली नव्हती. आता या चित्रपटासाठी ऐशची निवड करण्यात आल्याचे कळते. रोहितने नुकतेच ऐश्वर्याची भेट घेतली असून तिला या चित्रपटाची कथा ऐकवली. ऐश-शाहरुखची जोडी पुन्हा पडद्यावर दिसावी अशी रोहितची इच्छा आहे. ऐश्वर्याने या चित्रपटाला होकार दिला असल्याचे सूत्र सांगतात; पण रोहितने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.