घरापासून दूर आल्यावर मैत्रीचे वेगळे बॉँड निर्माण होतात, याची प्रचिती नॉर्वेजियन क्रूझवर येत आहे. एकमेकांसोबत सेल्फी काढून या आठवणी मनात ठेवण्यासाठी लगबग उडाल्याचे दिसत आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इटलीतील नेपल्स शहरात क्रूझने स्टॉप घेतला होता. या वेळी कलाकारांनी शॉपिंगचा आनंद लुटला. क्रूझवर सुनील शेट्टीचे आगमन झाल्यावर वातावरण भारून गेले होते. त्याच्यासोबत सेल्फीसाठी गर्दी उडाली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना भेटण्याची संधी यानिमित्ताने मिळाल्याबद्दल सुनीलनेही समाधान व्यक्त केले. क्रूझवर अनेक दिग्गज असल्याने जुन्या आठवणी आणि नव्या कल्पनांचे स्वागत होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि त्यांच्या कन्या तानिशा, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर आणि संध्या गोखले आहेत. ऊर्मिला आणि आदिनाथ कोठारे ही जोडी तर धमाल आणत आहे. या सगळ्या गमती-जमतींबरोबरच चित्रपट पाहण्याचा आनंदही घेतला जात आहे. त्याबाबतच्या चर्चांतून नव्या कलाकारांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभत आहे. - मिलन दर्डा (ताऱ्यांच्या क्रूझवरून)
इम्फा सोहळ्यात सेल्फींचा पाऊस
By admin | Updated: November 1, 2015 02:13 IST