Join us  

रामायण पाहून कोणीही राम बनत नाही - रणदीप हूडा

By admin | Published: October 26, 2015 1:40 PM

रामायण बघून कोणीही 'राम' बनत नाही की मुन्नाभाई एम.बी.बी.एस बघून कोणी 'गांधी' बनलं नाही, असे विधान रणदीप हूडाने केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - रामायण बघून कोणीही 'राम' बनत नाही की मुन्नाभाई एम.बी.बी.एस बघून कोणी 'गांधी' बनलं नाही, मग चार्ल्स शोभराजवरील चित्रपट पाहून कोणी चार्ल्स कसा बनेल? असा थेट सवाल अभिनेता रणदीप हूडाने विचारला आहे.
कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यात रणदीप मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पाहून कोणी गुन्हेगारीकडे वळले तर असा प्रश्न रणदीपला विचारण्यात आला असता, आम्ही चित्रपटातून गुन्हेगाराचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. चित्रपट पाहून देशातील तरूण चुकीच्या मार्गाकडे वळतात असं मला वाटत नाही.  जर रामायण पाहून कोणी 'राम' बनत नाही किंवा मुन्नाभाई बघून कोणी 'गांधीजी' बनत नाही, मग चार्ल्सवरील चित्रपट पाहून कोणी त्याच्यासारखं कसं बनेल, असा प्रश्न त्याने विचारला. चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठी असतो, त्यामुळे चित्रपट बघा आणि आनंद लुटा, असेही रणदीपने नमूद केले.