Join us  

देशाच्या अर्थव्यवस्थेला हादवून सोडणाऱ्या ‘स्कॅम 2003'मध्ये मराठी कलाकारांची फौज, ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 11:25 AM

'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी'चा टीझर रिलीज झाल्यापासून यात कोणकोण कलाकार असणार ही जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.

हंसल मेहता यांच्या  'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' चा टीझर रिलीज झाल्यापासून ही वेबसिरीज चर्चेत आहे.  ही वेबसिरीज 2003 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्यावर आधारित आहे.  1992 मध्ये झालेल्या 5000 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यावर ही वेबसिरीज आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून यात कोणकोण कलाकार असणार ही जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची कहाणी, ज्याने देशाला धक्का दिला. Scam 2003 या शो चा ट्रेलर रिलिज झाला असून या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे या ट्रेलर मध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार दिसत आहेत. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि  भरत जाधव देखील यावेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगीची भूमिका अभिनेते गगन देव रियार दिसणार आहे. गगन हे थिएटर आर्टिस्ट आहेत, जे सुशांत सिंग राजपूतच्या 'सोनचिरिया' आणि 'अ सुटेबल बॉय' या चित्रपटांमध्येही झळकले होते. 

 'स्कॅम 2003 - द तेलगी स्टोरी' ही वेबसिरीजचे हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शन केलं आहे.. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचे कथानक पत्रकार आणि वृत्तनिवेदक संजय सिंह यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या हिंदी पुस्तकातून घेण्यात आले आहे. 

टॅग्स :भरत जाधवशशांक केतकर