Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानच्या हाती लागला बिग बजेट सिनेमा, सैफ अली खानला देऊ शकते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 10:41 IST

सध्या सैफ अली खान 'सेक्रेड गेम्स'ला घेऊन चर्चेत आहे. याचबरोबर अनेक सिनमा सैफच्या जोळीत पडले आहेत. नितिन कक्कडच्या आगामी सिनेमात सैफ दिसणार आहे

ठळक मुद्देनितिन कक्कडचा हा सिनेमा बाप-मुलीच्या नात्यावर आधारित आहे

सध्या सैफ अली खान 'सैक्रेड गेम्स'ला घेऊन चर्चेत आहे. याचबरोबर अनेक सिनमा सैफच्या जोळीत पडले आहेत. नितिन कक्कडच्या आगामी सिनेमात सैफ दिसणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार नितिन कक्कडचा हा सिनेमा बाप-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. या सिनेमात सैफसोबत साराला कास्ट करण्याचा विचार चालू आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमाची कथा बाप-मुलीच्या नात्याभवती फिरणारी आहे. या सिनेमातून एक खास संदेश देण्यात येणार आहे. नितिनने सिनेमातील सैफच्या मुलीच्या भूमिकेसाठी साराला अप्रोच केले आहे. सिनेमाची कथा दोघांनाही खूप आवडली आहे, त्यामुळे सैफ आणि सारा यात बाप-लेकीच्या भूमिकेत दिसू शकतात. सैफ आणि साराला एकत्र स्क्रिनवर पाहाण इंटरेस्टिंग असणार आहे.

सारा अली खान अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे. 

‘केदारनाथ’च्या मार्गात सुरुवातीपासूनच एक ना अनेक अडचणी येत होत्या. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. यापश्चात ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते आणि ऐनवेळी निर्माता  आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते.कालांतराने अभिषेक कपूर व निर्माता प्रेरणा अरोरा यांच्यातील मतभेद निवळला आणि ‘केदारनाथ’चा मार्ग मोकळा झाला

टॅग्स :सारा अली खानसुशांत सिंग रजपूत