Join us  

सुशांत सिंग राजपूतवरील #MeToo आरोपांबाबत संजना सांघीने तोडली चुप्पी, म्हणाली, मला दुःख या गोष्टीचे वाटते...  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 1:21 PM

'दिल बेचारा' या चित्रपटातील सुशांतची सह अभिनेत्री संजना सांघी हिच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजना सुशांतवर करण्यात आलेल्या #MeToo आरोपांबद्दल बोलताना दिसते आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान या चित्रपटातील त्याची सहकलाकार अभिनेत्री संजना सांघीचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत संजनाने सुशांतवर करण्यात आलेल्या #MeToo आरोपांवरील चुप्पी तोडली आहे.

२०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही वृत्तांनुसार संजनाने सुशांतवर #MeToo अंतर्गत आरोप केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यादरम्यानच त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरेणही सुरु होते. संजनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली की, जेव्हा दोन व्यक्ती, खूप चांगले मित्र एका चित्रपटासाठी काम करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या बाबतीत एक दोन ठिकाणी वृत्त छापून येते. तेव्हा त्यांना वाटते की वेळेसोबत याचा विसर पडेल. कारण, नेमके सत्य काय आहे हे आम्हालाच ठाऊक आहे. पण, दु:ख या गोष्टीचे वाटते की, मुलीला न विचारताच तिच्याविषयी लिहिले जाते. त्यांना फक्त लिहायचेच असते. त्या मुलीने असे असे आरोप केले हे तुम्ही तिला न विचारता लिहूच शकत नाही. पण, तरीही असे झाले. हो अर्थात यामुळे सुशांत आणि मी अडचणीत आलो होतो. जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा मात्र आम्ही सत्य सर्वांपुढे आणण्याचा निर्णय घेतला. पण तरीही याचा संबंध #MeToo शी जोडला गेला. पण, तसे काहीच नव्हतं. देशात मीटू मोहिमेअंतर्गत बरीच प्रकरणं समोर आली होती. त्याचदरम्यान संजना आणि सुशांतच्या बाबतीतील वृत्त छापून आले होते.

पण, या सगळ्यामध्ये संजनाच्या नावे चुकीची माहिती देत त्यात सुशांतवर गंभीर आरोप करण्यात आले होते. जे संजनाने फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमीटू