‘बिग बॉस’ या टीव्ही रिअँलिटी शोच्या आठव्या सिझनसाठी स्पर्धकांची निवड सुरू झाली आहे. या सिझनमध्ये सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार संगीताला या शोची ऑफर मिळाली आहे. अद्याप या बातमीला दुजोरा मिळालेला नसला, तरी सध्या या चर्चेने जोर धरला आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सिझनमध्ये सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक ते दोन जण असतातच. यावेळीही असेच काही होण्याची शक्यता आहे. संगीतासह अभिनेता इंदरकुमार आणि अभिनेत्री अँमी ज्ॉक्सनच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. इंदरकुमारने अशी ऑफर मिळाली नसल्याचे म्हटले आहे. संगीता आता बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याने ती ‘बिग बॉस’मध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. यावर्षी हा शो सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.