प्रत्येक कलाकाराचे काही ना काही स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले तर त्या कलाकाराचा आनंद गगनात मावेनासा होतो. सध्या अशीच काहीशी परिस्थिती अभिनेत्री समीधा गुरूची झाली आहे. तिच्या या स्वप्नाविषयी समिधा लोकमत सीएनएक्सला सांगते, ‘मराठी इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार विक्रम गोखले यांच्यासोबत काम करण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. आज हेच स्वप्न माझे पूर्ण झाले आहे. मी विक्रम गोखले यांच्यासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. त्या चित्रपटाचे नाव भिरभिर असे आहे. या चित्रपटात विक्रम गोखले आणि मी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ही कथा असणार आहे. विक्रम गोखले यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करत असल्यामुळे याचा मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश सोमण आणि विवेक वाघ यांनी केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पावसामुळे मध्यंतरी बंद होते. पावसानंतर आता पुन्हा आमची पूर्ण टीम चित्रपटाचे चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.
समिधा गुरूचे स्वप्न झाले पूर्ण
By admin | Updated: November 10, 2016 03:26 IST