Join us  

नागा चैतन्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर समंथा रुथ प्रभूने उचलले हे मोठे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 1:53 PM

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी जाहीरपणे सांगितली होती. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. घटस्फोटानंतर समंथा सगळं काही विसरुन तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय.नागा चैतन्यपासून विभक्त होवून एक महिनाही पूर्ण झालेला नाही. नागा चैतन्यसोबतच्या नात्याला विसरणे हाच तिच्यासाठी पर्याय आहे. दोघांची कोणतीच आठवण तिने ठेवली नाहीय. नुकतेच समंथा रुथ प्रभूने असा धक्कादायक निर्णय घेतला आहे यामुळे सगळेच चक्रावून गेले आहेत.

समंथा अक्किनेनीने तिच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागा चैतन्यसोबतचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. नागा चैतन्यसोबतचे 80 हून अधिक फोटो आतापर्यंत तिने डिलीट केले आहेत. इतकंच काय तर लग्नाचे फोटोही इन्स्टाग्रामवरून हटवले आहेत. त्यामुळे या स्टार कपलच्या चाहत्यांना यावेळी मोठा धक्का बसला आहे.

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर घटस्फोटाची बातमी जाहीरपणे सांगितली होती. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा भव्य विवाह गोव्यात पार पडला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

दोघांच्या आवडी-निवडी पटल्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 6 अक्टूबर 2017 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले होते. दोघे 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ सिनेमात पहिल्यांदा एकत्र झळकले होते. तेव्हापासून दोघांनाही ऑनस्क्रीन पाहणे चाहत्यांना नेहमीच आवडायचे.

लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे,इतकेच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना खटकत होती. समांथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.समांथाला तिच्या घरच्यांचा कामासाठी विरोध करणे खटकत होते. अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जाते.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी