Join us

सालसा-बॉलरूम डान्स शिकतेय कृती

By admin | Updated: August 19, 2014 22:38 IST

अक्षय कुमारसोबतच्या ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटासाठी कृती सनोन तयारीला लागली आहे.

अक्षय कुमारसोबतच्या ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटासाठी कृती सनोन तयारीला लागली आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी या हिरोपंती गर्लने अनेक नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. सध्या ती सालसा आणि बॉलरूम डान्स शिकत असल्याचे कळते. सूत्रंनुसार कृती सध्या नृत्याचा नियमित सराव करीत आहे. या डान्स फॉर्म्ससाठी विशिष्ट पोश्चरची आवश्यकता असते, त्यामुळे या डान्स स्टाईल शिकण्यासाठी ती बरीच मेहनत घेताना दिसते. तिच्या प्रशिक्षकांनी तिला स्पेशल म्युजिक ऐकायला सांगितले आहे, त्यामुळे ती बीट समजू शकेल आणि डान्स इम्प्रूव करू शकेल.