Join us

सलमानच्या बहिणीच्या घरात झाली चोरी..

By admin | Updated: August 23, 2016 10:37 IST

अभिनेता सलमान खानची अर्पिता खानच्या घरात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली असून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लुटला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान- शर्मा हिच्या घरात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली असून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे. वांद्रे पश्चिमेकडील पॅसिफिक हाईट्स इमारतीत अर्पिता तिचा पती आयुष शर्मा व मुलासोबत राहते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वी ही चोरी झाली असून रविवारी दुपारी घरी येईपर्यत अर्पिता-आयुषला या चोरीबद्दल काहीच माहिती नव्हते. 
दरम्यान याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अर्पिता-आयुषच्या घरी काम करणा-या आफसा या मोलकरणीचा शोध घेत असून गेल्या काही दिवसांपासून ती गायब असल्याचे समजते.