Join us

शूटिंगआधीच सलमानच्या म्युझिकला डिमांड

By admin | Updated: May 29, 2014 15:10 IST

राजश्री प्रॉडक्शनसोबत सलमान खान ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू झाले नसले, तरी संगीताचे हक्क मात्र १८ कोटीला विकण्यात आले आहेत.

राजश्री प्रॉडक्शनसोबत सलमान खान ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे  शूटिंग अद्याप 
सुरू झाले नसले, तरी संगीताचे हक्क मात्र १८ कोटीला विकण्यात आले आहेत. झी म्युझिकने सूरज बडजात्यांचा चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ चे संगीत १८ कोटी रुपयांत खरेदी केले.  राजश्री प्रॉडक्शन आणि फॉक्स स्टार स्टुडिओ हे एकत्रितरीत्या हा चित्रपट बनवत आहेत. फॉक्स स्टुडिओ या चित्रपटाचे विदेशी मार्केट बघणार असून, राजश्री प्रॉडक्शन देशांतर्गत बिझनेसची देखरेख करणार आहे. फॉक्सने संगीतासाठी झी म्युझिकसोबत टॉयअप केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच चित्रपटाची शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती सूरज बडजात्याने दिली आहे.