Join us

सलमान म्हणणार अलविदा

By admin | Updated: April 30, 2017 03:31 IST

एका रिअ‍ॅलिटी शोच्या सुरुवातीच्या काही सिझनचे अमिताभ बच्चन, अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले होते. पण गेल्या काही सिझनपासून सलमान या कार्यक्रमाचा

एका रिअ‍ॅलिटी शोच्या सुरुवातीच्या काही सिझनचे अमिताभ बच्चन, अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले होते. पण गेल्या काही सिझनपासून सलमान या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची त्याची स्टाइल सगळ्यांनाच खूप आवडते. सलमानने मोठ्या पडद्यावर त्याचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचसोबत आता तो छोट्या पडद्यावरदेखील चांगलाच सेट झाला आहे. त्याच्या आणखी एका रिअ‍ॅलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेऊन कित्येक वर्षं झाली आहेत. पण आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, याचे सूत्रसंचालन सलमानच करणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनसाठी त्याला विचारले असून, सलमान यासाठी तयार झालेला असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमामुळे निर्माण होणारे वादविवाद यांना कंटाळल्यामुळेच त्याने हा कार्यक्रम न करता दुसरा रिअ‍ॅलिटी शो करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.