Join us

सलमान होणार सुल्तान

By admin | Updated: March 7, 2015 23:14 IST

सलमान लवकरच अली अब्बास जफरच्या ‘सुल्तान’ सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे. ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये प्रेमची भूमिका साकारल्यानंतर सलमान ‘सुल्तान’ या नवीन अवतारात दिसणार आहे.

सलमान लवकरच अली अब्बास जफरच्या ‘सुल्तान’ सिनेमाचे शूटिंग सुरू करणार आहे. ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये प्रेमची भूमिका साकारल्यानंतर सलमान ‘सुल्तान’ या नवीन अवतारात दिसणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, सलमानला सिनेमाची पटकथा पसंत पडली आहे आणि लवकरच तो होकारही देणार आहे. तो सप्टेंबरपासून याची शूटिंग सुरू करणार आहे. मागील दिवसांत सलमानने अलीची भेट घेऊन सिनेमाचे शूटिंग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने सिनेमासाठी तारखासुद्धा दिल्या आहेत.