Join us

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने सलमानला धक्का

By admin | Updated: April 2, 2016 16:07 IST

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी मिळाल्यानंतर सलमान खानलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २ - 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे मनोरंजन जगतातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्व कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूवर दुख: व्यक्त करत आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खानदेखील असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी मिळाल्यानंतर सलमान खानलादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 
 
बॉलीवूडलाईफ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि प्रत्युषा बॅनर्जीमध्ये चांगली मैत्री होती. प्रत्युषानेदेखील सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर होणा-या वाढदिवसाच्या पार्टींना हजेरी लावली होती. प्रत्युषाने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. सलमान खानने तो सीझन होस्ट केला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी ती खुपच तरुण असल्याचं मत सलमानने त्यावेळी व्यक्त केलं होतं.