Join us

सैफची मुलगी सारा सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या प्रेमात ?

By admin | Updated: May 7, 2016 08:36 IST

सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ७ - करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सिक्वेलमध्ये झळकणारी सैफ अली खानची कन्या सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे. सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे. या फोटोत ती वीरचे चुंबन घेताना दिसत आहे.सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चाही सध्या सुरु आहेत. त्यातच या दोघांच्या फोटोंमुळे मात्र या चर्चांसाठी चांगलेच खाद्य मिळाले आहे.

साराने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून तिने हा आपला बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले आहे. तो मोठ्या मनाचा असून संवेदनशील आहे. ज्याच्यासोबत हातात हात घालून बीचवर फिरावे असे वाटेल असाच तो आहे, असे साराने लिहिले आहे.