Join us  

अधुरी एक कहानी! सैफच्या आधी या अभिनेत्यावर होतं अमृता सिंगचं जीवापाड प्रेम, गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 8:00 AM

अमृता सिंग आपल्यापेक्षा वयाने ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात ठार वेडी झाली होती. दोघांना लग्न ही करायचं होते पण...

अभिनेता सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिले. अनेक मोठ्या स्टारसोबत काम केलं आणि बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण केली. सिनेमातील तिचा बिनधास्त अंदाज कांना खूप आवडत होता. अमृतने करिअर यशाच्या शिखरावर असताना सैफ अली खानशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या अनेक वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. याआधी अमृता सिंगचं  ब्रेकअप झाले होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानसोबत लग्न होण्यापूर्वी अमृता सिंगचं एकदा नव्हे तर तीनदा ब्रेकअप झाले होते. 

 या अभिनेत्रीने 1983 मध्ये सनी देओलसोबत 'बेताब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यांदा ती सनी देओलच्या प्रेमात पडली होती. मात्र, सनी विवाहित होती आणि हे जाणून अभिनेत्री नाराज झाली होती. याशिवाय अमृता सिंग क्रिकेटर रवी शास्त्रीसोबत रिलेशनशीपमध्ये चर्चेत होती.  रवि आणि अमृता दोघांनाही लग्न करायचं होतं. पण असं म्हणतात की, रविने लग्नाआधी अमृतासमोर एक अट ठेवली होती. मीडिया रिपोर्टनुसार, रविची इच्छा होती की, अमृताने लग्नानंतर सिनेमात काम करू नये. हे अमृताला आवडलं नाही.  अमृताने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर अमृता पुन्हा एकदा प्रेमात पडली. 

बंटवारा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हे प्रेम  बहरलं. अमृता तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नाच्या प्रेमात पडल्याची खबर तिच्या आईच्या कानावरही गेली. आईने लगेच अमृताला विनोद खन्नापासून दूर राहण्याची सूचना केली. आई प्रेमात आडवी आल्यावर, अमृताने भावनांना आवर घातला. आईच्या मनाविरूद्ध जाणं तिला मान्य नव्हतं. यानंतर अमृताने विनोद खन्नांपासून ब्रेकअप केलं. याच काळात विनोद खन्नाही आध्यात्मात गुंतला आणि ही लव्हस्टोरी संपुष्टात आली.

 

टॅग्स :अमृता सिंगसैफ अली खान