संजीव वेलणकर
पुणे, दि. १७ - प्रसिद्ध अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोाघांची जोडी 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्या दोघांचाही वाढदिवस (१७ ऑगस्ट) एकाच दिवशी असतो.
१७ ऑगस्ट १९५७ साली जन्मलेेले सचिन पिळगवाकर गेल्या ५ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.
त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश- एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैराग‘च्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्याबोरबर त्यानं दोन-तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट "अष्टविनायक‘या चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.
तर १७ ऑगस्ट १९६७ साली जन्मलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली. १९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.
'माझा पती करोडपती', 'कुंकू', 'अशी ही बनवाबनवी' अश्या ब-याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या 'तू तू मै मै' टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. सचिन-सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते. काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा 'खुबसुरत' केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर 'ऐतबार' मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. 'ऐतबार' चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव 'ऐतबार'साठी सुचविले. चित्रपटांच्या बरोबरीने 'तू तू मै मै', 'क्षितीज ये नही', 'शादी नंबर वन', 'कभी बिबी कभी जासूस' ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणा-या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील ‘दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’, ‘एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी’, ‘ससुराल गेंदा फूल’ ‘कुछ रंग प्यार के एसे भी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील "तू तू - मैं मैं" या कार्यक्रमामधे सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.सचिन पिळगावकर आणि ह्यांची जोडी 'रील लाईफ' मधून 'रियल लाईफ'मध्ये एकमेकांची साथीदार झाली.
लोकमत समूहातर्फे सुप्रिया व सचिन पिळगवाकर या दांपत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!