Join us  

मंगळसूत्र आहे, कामसूत्र नाही..., फॅशन डिझाईनर Sabysachi Mukherjeeवर भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 2:47 PM

Sabysachi Mukherjee : लोक म्हणाले, सब्यसाची नाही, ‘अ’सभ्यसाची...; वाचा काय आहे भानगड

बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते फॅशन डिझाईनर सब्यसाची मुखर्जी (Sabysachi Mukherjee) त्यांच्या युनिक स्टाईल आणि सणासुदीसाठी खास डिझाईन केलेल्या कपड्या व दागिन्यांसाठी ओळखले जातात. पण सध्या हेच सब्यसाची सोशल मीडियावर कधी नव्हे इतके ट्रोल होत आहेत. होय, धनत्रयोदशी व दिवाळीनिमित्त त्यांनी महिलांसाठी ‘इंटिमेट फाइन ज्वेलरी’ हे खास पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन लॉन्च केलं आहे. पण या दागिन्यांची जाहिरात करताना सब्यसाची चुकले. होय, नेटकºयांच्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच वाटतंय. या ज्वेलरी अ‍ॅड कॅम्पेनचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. पण हे फोटो पाहून नेटकरी भडकले. भडकणाºयांमध्ये बहुतांश महिला आहेत, हे विशेष. या फोटोत सब्यसाची यांनी मंगळसूत्राची जाहिरात केली आहे. मात्र या जाहिरातीसाठी बोल्ड फोटोशूट करण्यात आलं आहे. शेअर केलेल्या दोन वेगवेगळ्या फोटोत दोन काही मॉडेल्स तोकड्या कपड्यांमध्ये मंगळसूत्राची जाहिरात करताना दिसत आहेत.या जाहिरातील नेटक-यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंगळसूत्राची जाहिरात करण्यासाठी अशा पद्धतीचं फोटोशूट करणं गरजेचं आहे का, असा प्रश्न अनेकांनी त्यांना केला आहे.

 हे मंगळसूत्र आहे की कामसूत्र, अशा शब्दांत एका चाहत्याने आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी सब्यसाचीवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. दागिन्यांचं प्रमोशन करा, महिलांच नको.  तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे फोटो पाहून कोणीही तुमचे दागिने खरेदी करणार नाही, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

 

सब्यसाची हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. अनेक बड्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यांसाठी त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. कपड्यांसोबतच सब्यसाची ब्रँडचे दागिनेसुद्धा त्यांच्या अनोख्या डिझाइनमुळे चर्चेत असतात. सुंदरतेची वेगळी परिभाषा मांडणारे डिझाईनर अशी त्यांची ओळख आहे. सब्यसाची ब्रँडच्या फोटोशूटमध्ये अनेकदा सावळ्या आणि स्थूल मॉडेल्सनाही प्राधान्य दिलं जातं.

टॅग्स :सब्यसाची