Join us

बॉलीवूड सोडण्याच्या अफवांनी त्रस्त

By admin | Updated: December 20, 2014 21:12 IST

अभिनेत्री असीन सध्या टिष्ट्वटरवरील अफवांमुळे त्रस्त झाली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

अभिनेत्री असीन सध्या टिष्ट्वटरवरील अफवांमुळे त्रस्त झाली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. असीनने बॉलीवूड सोडले असून, ती पुन्हा दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळली असल्याचे म्हटले जात आहे. बॉलीवूडमध्ये काम न मिळाल्याने ती दक्षिण भारतीय चित्रपट करत असल्याच्या अफवा काही लोक उडवत असल्याचे तिला समजले तेव्हा तिला वाईट वाटले. ती म्हणाली,‘ माझे टिष्ट्वटरवर अकाऊंट नाही, मी कोणताही दक्षिण भारतीय चित्रपट सध्या करत नाही. बॉलीवूडमध्ये माझ्याकडे भरपूर काम असून मी येथे चित्रपट करत आहे. आता कोणताही गैरसमज होणार नाही, अशी अपेक्षा आहे.’