Join us  

Ronit Roy : “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉयची पोस्ट अन् स्मृती इराणींची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 5:26 PM

Ronit Roy, Smriti Irani : नुकतंच रोनित रॉयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहून चाहते टेन्शनमध्ये आलेत. अगदी स्मृती इराणी यांचंही टेन्शन वाढलं.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील मिस्टर बजाज या भूमिकेने रोनित रॉय घराघरात पोहोचला. या मालिकेने रोनित रॉयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.  छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावर देखील त्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सध्या रोनित चर्चेत आहे तो त्याच्या एका पोस्टमुळे. होय, नुकतंच रोनित रॉयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याची ही पोस्ट पाहून चाहते टेन्शनमध्ये आलेत. अगदी रोनितसोबत एकेकाळी स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचंही टेन्शन वाढलं. रोनितच्या पोस्टवर स्मृती इराणींनी केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

रोनितची पोस्ट

“भाई, ब्रो…हे शब्द त्यांचं महत्त्व गमावून बसले आहेत. जेव्हा कोणी या शब्दांनी मला हाक मारतं, तेव्हा मी ते फार गांभीर्याने घेतो. पण नंतर तेच लोक शत्रूबरोबरही वागू नये, असं माझ्याबरोबर वागतात. यामुळे मला खूप वेदना होतात…पण चलता है… यामुळे त्यांची लायकी दिसते, माझी नाही...,” असं रोनितने पोस्टमध्ये लिहिलं आहे. कॅप्शनमध्येही त्याने बनावटी लोकांबद्दल संताप व्यक्त केला. पैसा, प्रतिष्ठा या गमावलेल्या गोष्टी परत मिळवता येतात. पण वेळ, प्रेम, आदर आणि नाती एकदा गमावल्यानंतर कधीच परत मिळत नाहीत. फेक का वागता, तुम्हाला रिअल होण्याची गरज आहे, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

स्मृती इराणींची कमेंट

 

रोनितच्या या पोस्टवर रूपाली गांगुली, स्मृती इराणी यांनीही कमेंट्स केल्यात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही रोनितच्या पोस्टनंतर कमेंट करत “काय झालं?” असं विचारलं.  रोनित रॉय व स्मृती इराणी यांनी ‘क्योंकी की सास भी कभी बहु थी’ मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी तर रोनित यांनी त्यांच्या पती मिहीरची भूमिका साकारली होती.  

टॅग्स :रोनित रॉयस्मृती इराणी