बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन सध्या फारशी कुठे दिसतच नाही. हिंदी चित्रपटातीत तिच्या काही ठराविक भूमिका सोडल्या तर रिया फारशा लक्षात राहण्यासारख्या भूमिका केल्या नाहीयेत. आता रियाला मात्र मराठी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे म्हणे. अहो असे आम्ही सांगत नाही. तर स्वत: रियाने या बातमीला दुजोरा दिला आहे. रियाने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे. तर मराठी चित्रपटांच्या कथा उत्तम असल्याचेही तिने सांगितले आहे. आज मराठी सिनेमा साता समुद्रापार पोहोचला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आपणही मराठी चित्रपटाचा भाग होऊयात असे वाटू लागले आहे. प्रियांका चोप्रासारख्या बॉलिवूड अभिनत्रीलाही मराठी चित्रपट बनविण्याची भूरळ पडल्यचे आपण पाहिले आहे. बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची का होईना पण भूमिका साकारली असल्याचे आपण पाहिलेय. परंतु आता हेच कलाकार मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करायची असल्याचे जगजाहीर बोलत असताना पाहायला मिळतेय.
रिया सेन मराठी चित्रपटात?
By admin | Updated: November 17, 2016 07:24 IST