Join us  

सुशांतच्या मृत्यूनंतर ट्रोल झालेल्या रिया चक्रवर्तीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- 'कोण आहेत ते…'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:57 AM

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakravarti) सध्या एमटीव्ही रोडीज(MTV Rodies)च्या सीझन १९ मध्ये पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakravarti) सध्या एमटीव्ही रोडीज(MTV Rodies)च्या सीझन १९ मध्ये गँग लीडर म्हणून पाहायला मिळत आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput)च्या निधनानंतर वाईटरित्या ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रियाने या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना म्हटले की, 'लोक त्यांना जे हवे ते म्हणतात पण आपण हिंमत गमावली नाही पाहिजे'.

शोच्या या एपिसोडचा व्हिडीओ रिया चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोमध्ये आलेल्या स्पर्धकांशी संवाद साधताना रिया सांगत आहे की, अनेक लोक तिच्याबद्दलही अनेक गोष्टी बोलले आहेत. मलाही अनेक लेबल दिली आहेत..पण मी ती लेबले स्वीकारू का? त्यांच्यामुळे मी माझे आयुष्य जगणे थांबवणार का..अजिबात नाही खड्ड्यात जाऊ दे...कोण आहेत ते.

रोडीजमध्ये रिया चक्रवर्तीला झाला होता विरोधरिया चक्रवर्तीने जेव्हा रोडीजमध्ये भाग घेतला तेव्हा सोशल मीडियावर मोठा गोंधळ झाला होता. शोच्या चाहत्यांनी यावर बरेच आक्षेप नोंदवले. त्याचवेळी शोमध्ये तिचे आणि प्रिन्स नरुलामध्ये अनेकदा वाद झाले आहेत. तरीही दोघेही या शोचा भाग आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासात रियाला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती शेवटची २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'चेहरे' या थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत दिसली होती. आता अभिनेत्री एमटीव्ही रोडीजच्या सीझन १९ मध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसत आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत