यशराज बॅनरच्या आगामी ‘बँकचोर’ या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखसोबत नवोदित अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कास्ट करण्यात आले आहे. रियाने ‘मेरे डॅड की मारुती’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. निर्मात्यांना या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता, त्यामुळे तिची निवड केल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक बम्पी असून, निर्माता आशिष पाटील आहेत. लवकरच बँकचोरचे शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.