Join us  

आकाशसोबत नाही तर या अभिनेत्यासोबत रिंकू राजगुरू रिलेशनशीपमध्ये?, त्याच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 3:12 PM

अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)चं नाव नेहमीच आकाश ठोसर(Akash Thosar)सोबत जोडलं जातं. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळते. मात्र यावेळी रिंकूच नाव आकाशऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासोबत जोडले गेले आहे.

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)चं नाव नेहमीच आकाश ठोसर(Akash Thosar)सोबत जोडलं जातं. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळते. मात्र यावेळी रिंकूच नाव आकाशऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासोबत जोडले गेले आहे. आता हा कोण अभिनेता आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. हा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar). ललित प्रभाकरने नुकतीच इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. जी पाहून नेटकरी रिंकू आणि आकाश एकमेकांना डेट करत असल्याचं बोलत आहेत.

ललित प्रभाकर याने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले होते. ज्या फोटोंमध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसते आहे. दोन्ही फोटोंमध्ये त्याने या तरुणीचा चेहरा झाकलेला दिसतो आहे. पहिल्या फोटोत ललितच्या खांद्यावर डोके ठेवून ही तरुणी पाठमोरी उभी आहे तर ललित तिच्याकडे हात दाखवतोा. हा फोटो शेअर करत त्याने असं लिहिले की, 'ओळखा कोण आहे?'

यानंतर ललितने आणखी एक फोटो शेअर केला. ज्यात त्याने या तरुणीच्या चेहऱ्यावर एक वाक्य लिहून तिचा चेहरा झाकला आहे. ललितने असे लिहिले की, 'मोठी बातमी, Stay Tuned'. आता अभिनेता त्याच्या आयुष्यात एखादी तरुणी आली आहे याबाबत सांगणार की आगामी प्रोजेक्टमध्ये सांगणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. चाहते या प्रतीक्षेत आहेत की ललितने नेमके कोणत्या तरुणीसोबत फोटो पोस्ट केले आणि तो काय घोषणा करणार आहे? . ही तरुणी म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे. आता या फोटोनंतर जरी त्यांच्या रिलेशनशीपबाबत बोलले जात आहे. पण तुम्हाला वाटतं तसं काही नाही. ललित आणि रिंकू अशी फ्रेश जोडी आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे नाव आहे खिल्लार. या चित्रपटात ते दोघे झळकणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे 'खिल्लार' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी 'खिल्लार' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल.

मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो 'खिल्लार' चित्रपटातून मांडत आहे. रिंकू राजगुरूनं कागर या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यामुळे मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे. चित्रपटाविषयी मकरंद माने म्हणाला, की बैलगाडा शर्यतीचा विषयच अगदी जिव्हाळाचा आहे. महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ पडद्यावर रंगवताना 'खिल्लार'मधून मैदान जोरदार रंगणार माझी खात्री आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूआकाश ठोसरललित प्रभाकर