Join us  

Mauli Movie Review : दमदार अॅक्शन

By प्राजक्ता चिटणीस | Published: December 13, 2018 11:42 PM

माऊली या चित्रपटात रितेश देशमुख, सैयामी खेर, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत

ठळक मुद्देमाऊली या चित्रपटाची सुरुवातीची काही मिनिटे ही व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात घालवली आहे. त्यामुळे चित्रपट सुरुवातीला संथ वाटतो. पण चित्रपटातील अतिशय महत्त्वाचे रहस्य उलगडल्यानंतर चित्रपटाला एक वळण मिळते.या सगळ्यात बाजी मारली आहे ती रितेश देशमुखने. त्याने त्याची भूमिका, त्यातील विविध छटा इतक्या सुंदरपणे मांडल्या आहेत की त्याच्या अभिनयाला दाद देणे गरजेचे आहे. जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सैयामी खेर यांनी देखील त्याला खूप चांगली साथ दिली आहे.
Release Date: December 14, 2018Language: मराठी
Cast: रितेश देशमुख, सैयामी खेर, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव
Producer: आदित्य सरपोतदारDirector: आदित्य सरपोतदार
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस 

लई भारी या चित्रपटाद्वारे रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यानंतर आता माऊली या चित्रपटाद्वारे तो त्याच्या फॅन्सच्या पुन्हा भेटीस आला आहे. या चित्रपटातील रितेशचा अभिनय आणि अॅक्शन पाहता हा चित्रपट त्याच्या फॅन्सची निराशा करणार नाही.

माऊली (रितेश देशमुख) एका गावात पोलीस ऑफिसर म्हणून येतो. त्या गावात नाना (जितेंद्र जोशी) या गावगुंडाचे राज्य असते. गावातल्या लोकांना तो प्रचंड त्रास देत असतो. लोकांच्या जमिनी बळकावणे, लोकांना मारणे ही त्याची नित्याची कामे असतात. माऊली गावात आल्यानंतर तो त्याला देखील सतावू लागतो. या सगळ्याला माऊली तोंड कसा देतो? नानाचे प्रस्थ कशाप्रकारे संपवतो, हे माऊली या चित्रपटात पाहायला मिळते.

माऊली या चित्रपटाची सुरुवातीची काही मिनिटे ही व्यक्तिरेखांची ओळख करून देण्यात घालवली आहे. त्यामुळे चित्रपट सुरुवातीला संथ वाटतो. पण चित्रपटातील अतिशय महत्त्वाचे रहस्य उलगडल्यानंतर चित्रपटाला एक वळण मिळते. चित्रपटात आता काही तरी वेगळे घडेल असे वाटत असताना पूर्वीच्या अनेक बॉलीवूड चित्रपटात वापरण्यात आलेले तेच तेच कथानक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाच्या कथेत दम नसल्याने तसेच चित्रपटात पुढे काय होणार याची कल्पना आधीच येत असल्याने चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अयशस्वी ठरतो. पण या सगळ्यात बाजी मारली आहे ती रितेश देशमुखने. त्याने त्याची भूमिका, त्यातील विविध छटा इतक्या सुंदरपणे मांडल्या आहेत की त्याच्या अभिनयाला दाद देणे गरजेचे आहे. जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सैयामी खेर यांनी देखील त्याला खूप चांगली साथ दिली आहे. जेनेलिया आणि रितेश एका गाण्यात एकत्र थिरकताना दिसतात. ही त्या दोघांच्या फॅन्ससाठी एक पर्वणीच आहे. जेनेलिया खूपच छान दिसत असून त्यांची केमिस्ट्री मनाला भावते. चित्रपटातील अॅक्शन दृश्य मस्त जमून आली आहेत. तसेच चित्रपटाच्या संवादासाठी संवाद लेखकाचे जितके कौतुक करू तितके कमी. या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणार यात शंकाच नाही. चित्रपटातील गाणी तितकीशी ओठावर रुळत नाहीत. पण बॅकराउंड स्कोर मस्त झाले आहे. एकंदरीत या माऊलीला भेटायला हरकत नाही. 

टॅग्स :माऊलीरितेश देशमुखसंयमी खेरसिद्धार्थ जाधवजितेंद्र जोशी