Join us  

 Jalebi Movie Review: ना गोड, ना कुरकुरीत खमंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:42 PM

महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. 

Release Date: October 12, 2018Language: हिंदी
Cast:   रिया चक्रवर्ती, वरुण मित्रा, दिगांगना सुर्यवंशी
Producer: महेश भट्ट, विशेष फिल्म्सDirector: पुष्पराज भारद्वाज
Duration: 1 तास 52 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

-श्वेता पांडे

महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित ‘जलेबी’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात रिया चक्रवर्ती आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. रिया यापूर्वी अनेक चित्रपटात दिसली असली तरी वरूण मित्राचा हा पहिला चित्रपट आहे. तेव्हा जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट ... चित्रपटाची कथा सुरू होते एका ट्रेन जर्नीने अर्थात रेल्वे प्रवासाने. प्रेमभंग झालेली आयशा(रिया चक्रवर्ती) मुंबई ते दिल्ली या रेल्वेप्रवासाला निघालेली असते. तिच्या समोरच्या सीटवर एक महिला आपल्या सात वर्षांच्या मुलीसोबत प्रवास करत असते. त्या महिलेच्या गप्पा ऐकून तिचे आपल्याशी  भूतकाळाशी नाते असल्याचे आयशाला जाणवते. काहीच वेळात, ज्याने आपला प्रेमभंग केला, त्याचीच ही पत्नी असल्याचे आयशाला कळते. याचदरम्यान तिच्या भूतकाळातील एक एक घटना समोर यायला लागतात आणि मध्यांतरापर्यंत  ज्याच्यावर आयशा स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करत असते तो  देव (वरूण मित्रा) ही समोर येतो. देवशी ब्रेकअप झाल्यानंतर आयशाचे अख्खे आयुष्य जणू थांबलेले असते. याऊलट देव आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करत बराच पुढे गेलेला असतो. सरतेशेवटी गत स्मृतींच्या अनेक तुकड्यांना जोडणाºया या प्रवासात देव काही गोष्टींची प्रांजळ कबुली देतो. या चित्रपटाचे नाव ‘जलेबी’ आहे. पण ही ‘जलेबी’ ना गोड आहे, ना कुरकुरीत, खमंग. ‘जलेबी’च्या कथेत ना पुरेसा गोडवा आहे, ना ती योग्यप्रकारे तळल्या गेली आहे. परिणामी एक अख्खा चित्रपट बेचव झाला आहे.चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांची कथा गुंफली गेलीय. पण ट्रेनमधील अन्य प्रवासांच्यी साधी तोंडओळखही चित्रपट करून देत नाही. नेमक्या याच कारणाने चित्रपटात अपूर्णता जाणवते. तो अपूर्ण वाटतो. दिग्दर्शक ते पटकथा या सगळ्यांच टप्प्यांवर चित्रपट उणा ठरतो. चित्रपटाची कथा खरे तर चांगली होती. पण ती योग्यरित्या गुंफली गेलेली नाही. अभिनयाचे सांगाल तर कलाकारांनी जणू अभिनय केलाच नाही किंवा केला तो अतिरेक केला.प्रेग्नंट रिया चक्रवर्तीचा बेबी बम्प आधी मोठा दिसतो, मग अचानक लहान. तिच्या नखांवरचा रंग अर्थात नेलपेंटही सुरूवातीपासून शेवटपर्यंत बदलत नाही. म्हणायला दिगांगना ठीक ठाक अभिनय केलाय, पण मुळातचं तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत ती कुठेच फिट बसतनाही. क़ाही दृश्यात वरूण मित्रा बरा दिसतो. पण काही दृश्यात त्याच्या चेहºयावरचे भाव विचित्र गटात मोडतात. संगीतही फार सुखावणारे नाही.खरे तर प्रेमकथा बॉक्सआॅफिसवर कमाल करतात. पण ‘जलेबी’ मात्र कमाल कमी अन् निराशाचं अधिक करते.

टॅग्स :जलेबीरिया चक्रवर्ती