वेल...तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय बरं का! जेनेलिया डिसूझा देशमुख सध्या दुसऱ्यांदा गरोदर असून पती रितेशक डून ती चांगलेच लाड आणि सेवा करून घेताना दिसते आहे. नुकतेच करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी काय झाले? जेनेलियाला जेवणे अवघड जाऊ लागले, म्हणून पती रितेशने पुढे होऊन तिला जेवू घालण्यास सुरुवात केली. मग काय? जेनेलियाची तर मज्जाच झाली. चक्क पतीच जेवू घालतो, म्हटल्यावर काय... तिची तर मजाच आहे ना! जेनेलिया-रितेश यांना अगोदरच एक मुलगा रिआन आहे. रितेश सध्या ‘हाऊसफुल्ल ३’ या कॉमेडी चित्रपटासाठी शूटिंग करत असून, त्यातील गाणे यूट्युबवर हिट होत आहेत, तसेच मराठीत ‘बँजो’ चित्रपटाची शूटिंगही तो करतो आहे.
रितेश करतोय जेनेलियाची सेवा?
By admin | Updated: May 4, 2016 01:35 IST