Join us  

होता हार्ट अटॅक, रेमोला वाटली अ‍ॅसिडीटी; देवदूतासारखा धावून आला सलमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 11:10 AM

सलमानने असे काय केले की, लिजेलने त्याला ‘देवदूत’ म्हटले, असा प्रश्न यानंतर अनेकांना पडला होता. तर त्याचे कारण आत्ताकुठे समोर आलेय.

गेल्या 11 डिसेंबरला बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पाठोपाठ त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांच्या उपचारानंतर रेमोना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सध्या रेमो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. त्याच्या रिकव्हरीनंतर त्याची पत्नी लिजेलने एक पोस्ट शेअर करून अनेकांचे आभार मानले होते. यात एक नाव सलमान खानचेही होते. सलमानने असे काय केले की, लिजेलने त्याला ‘देवदूत’ म्हटले, असा प्रश्न यानंतर अनेकांना पडला होता. तर त्याचे कारण आत्ताकुठे समोर आलेय.

एका सूत्राच्या हवाल्याने ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेमोला कोकिळाबेन रूग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर लिजेलने सर्वात पहिला फोन कोणाला करावा तर तो सलमान होता. सलमान त्यावेळी दुस-या फोनवर होता. 5 मिनिटाच्या आतच त्याने लिजेलला कॉल बॅक केला. रेमोवर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लिजेलची अवस्था वाईट होती. रेमोच्या काळजीने तिचा धीर खचत चालला होता. ती रूग्णालयात एकटी होती. अशावेळी सलमान तिच्या मदतीला धावून आला. लिजेल व सलमानच्या फोन कॉलनंतर सलमानची अख्खी टीम डॉक्टरांच्या टीमशी पर्सनली संपर्कात होती. सलमानही वेळोवेळी डॉक्टरांशी संपर्क साधत होता. लिजेलला तो सतत हिंमत देत होता. सलमानशी बोलून लिजेल बरीच रिअ‍ॅक्स झाली. रेमोच्या प्रकृतीबद्दल तिने आपल्या दोन्ही मुलांनाही सांगितले नव्हते. मोठा मुलगा झोपला होता आणि लहान मुलगा जिममध्ये होता.

हार्ट अटॅक आला अन् रेमोला वाटली अ‍ॅसिडीटीरेमो ट्रेडमिलवर होता. यानंतर फोम बॉलसोबत तो काही व्यायाम करत होता. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. आपल्याला अ‍ॅसिडीटी झाली, असेच त्याला सुरूवातीला वाटले. यानंतर जिना चढत असताना त्याला उलट्या सुरू झाल्या. यानंतर ताबडतोब लिजेलने त्याला रूग्णालयात हलवले. लिजेल इतकी घाबरली होती की, तिला काहीच सुचेना. अशावेळी सलमान सीनमध्ये आला आणि तेव्हा कुठे लिजेला धीर आला. सलमानचे हृदय सोन्याचे आहे, असे ती म्हणाली, ते त्याचमुळे.

 रेमो डिसुजाने अनेक सिनेमांची कोरिओग्राफी करण्यासोबतच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. 1995 साली त्याने त्याच्या करिअरची सुरूवात केली होती. 2000 साली ‘दिल पे मत ले यार’ या सिनेमासाठी कोरिओग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली आणि यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता तो इंडस्ट्रीतील टॉप कोरिओग्राफरपैकी एक आहे. कोरिओग्राफीनंतर त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. एबीसीडी,  एबीसीडी 2  आणि  स्ट्रीट डांसर  या सिनेमांचे त्याने दिग्दर्शन केले.

टॅग्स :रेमो डिसुझासलमान खान