- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १३ - हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात गायक, नट, हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार यांचा आज (१३ ऑक्टोबर) स्मृतिदिन.
बालपण
किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ साली मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार.
बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बोंम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना बरेच गाण्याच्या संधी मिळाल्या. इ.स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले. बाँम्बे टॉकीजच्या व फनी मजूमदार दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" (इ.स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोर चे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमार च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
शेवटची वर्षे
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरवातीला केले, उदा. बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परन्तु बॉक्स ऑफिस वर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.
राहुल देव बर्मन व राजेश रोशन च्या पाठींब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपूर च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर. इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी रीटायर होऊन खंडवाला जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अतंविधी साठी खंड़व्याला नेण्यात आला.
वैयक्तिक जीवन
किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ़ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत विवाहित होते. किशोर कुमार यांची दुसरी पत्नी ही प्रख्यात अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "चलती का नाम गाड़ी" (१९५८) सारख्या बऱ्याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले. मधुबालाचा मृत्यु २३ फेब्रुवारी १९६९ झाला. किशोर कुमार यांचे तिसरं लग्न योगीता बालीशी झाले. त्यानंतर १९८० साली किशोर कुमार यांनी लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. किशोर यांना दोन अपत्य, अमित कुमार (रुमा पासून) व सुमित कुमार (लीना पासून) आहेत.
चित्रपट
किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:
पडोसन(१९६८)
दूर गगन की छाँव में (१९६४)
गंगा की लहरें (१९६४)
मिस्टर एक्स इन बाँम्बे (१९६४)
हाफ टिकट (१९६२)
मनमौजी (१९६२)
झुमरू (१९६१)
चलती का नाम गाड़ी (१९५८)
दिल्ली का ठग (१९५८)
आशा (१९५७)
न्यू दिल्ली (१९५६)
बाप रे बाप (१९५५)
मिस माला (१९५४)
नौकरी (१९५४)
किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहे. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:
मिस्टर इंडिया (१९८७)
सागर (१९८५)
शराबी (१९८४)
अगर तुम ना होते (चित्रपट) (१९८३)
सत्ते पे सत्ता (१९८२)
नमक हलाल (१९८२)
लावारिस (१९८१)
रौकी (१९८१)
याराना (१९८१)
कर्ज़ (१९८०)
मुकद्दर का सिकंदर (१९७८)
डॉन (१९७८)
अनुरोध (१९७७)
शोले (१९७५)
खुशबू (१९७५)
जुली (१९७५)
आंधी (१९७५)
मीली (१९७५)
पोंगा पंडित (१९७५)
रोटी (१९७४)
कोरा कागज़ (१९७४)
अभिमान (१९७३)
यादों की बारात (१९७३)
परिचय (१९७२)
रामपुर का लक्ष्मण (१९७२)
बोँम्बे टू गोवा (१९७२)
मेरे जीवन साथी (१९७२)
हरे राम हरे कृष्ण (१९७१)
अमर प्रेम (१९७१)
अंदाज़ (१९७१)
बुढा मिल गया (१९७१)
शर्मीली (१९७१)
प्रेम पुजारी (१९७०)
कटी पतंग (१९७०)
प्यार का मौसम (१९६९)
पडोसन (१९६८)
ज्वैल थीफ (१९६७)
गाइड (१९६५)
तीन देवीयाँ (१९६५)
दूर गगन की छाँव में (१९६४)
मिस्टर अँक्स इन बोँम्बे (१९६४)
हाफ टिकट (१९६२)
मनमौजी (१९६२)
झुमरू (१९६१)
दिल्ली का ठग (१९५८)
नौ दो ग्यारह (१९५७)
पेइंग गेस्ट (१९५७)
फंटूश (१९५६)
हाऊस नम्बर ४४ (१९५५)
मुनिमजी (१९५४)
टैक्सी ड्राईवर (१९५४)
जाल (१९५२)
बाजी (१९५१)
बहार (१९५१)
किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले. १३ ऑक्टोबर १९८७ साली मुंबईत त्यांचे निधन झाले.
सौजन्य : मराठी विकिपीडिया