Join us  

खर्‍या आयुष्यात इतकी ग्लॅमरस आहे 'विवाह'ची छोटी, जबरदस्त ट्रान्सफॉर्मेसन पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 3:52 PM

Vivaah या चित्रपटात एक अशी व्यक्तिरेखा होती, जी सर्वांच्या मनात घर करून गेली. छोटी ही भूमिका तुम्हाला आठवत असेलच. अमृताच्या चुलत लहान बहिणीची भूमिका साकारली होती अभिनेत्री अमृता प्रकाशने (Amruta Prakash)

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अमृता राव (Amrita Rao) यांचा 'विवाह' (Vivaah) चित्रपट आठवतोय? राजश्री प्रॉडक्शनचा हा चित्रपट एक कौटुंबिक ड्रामा होता, ज्यात शाहिद आणि अमृता यांच्या रोमँटीक केमिस्ट्रीने रसिकांची भरघोस पसंती मिळवली. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. चित्रपटातली गाणी तर आजही रसिकांच्या ओठांवर रेंगाळतात. लग्न मौसमात तर या चित्रपटाच्या गाण्याशिवाय लग्नसोहळे पूर्णच होत नाही. चित्रपटातल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहेत.   

या चित्रपटात एक अशी व्यक्तिरेखा होती, जी सर्वांच्या मनात घर करून गेली. छोटी ही भूमिका तुम्हाला आठवत असेलच. अमृताच्या चुलत लहान बहिणीची भूमिका साकारली होती अभिनेत्री अमृता प्रकाशने (Amruta Prakash). रसिकांना ही भूमिका खुपच भावली होती.आता ती 'छोटी' मोठी झालीये आणि खूपच ग्लॅमरस दिसतेय. ती अभिनेत्री आता कुठे आहे ? कशी दिसते ? काय करत आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडले असणारच. तर सोशल मीडियावर तुम्हाला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. आता ती कमालीची सुंदर दिसते. तिच्या एक से बढकर एक अदा पाहून तुम्हीही घायाळ व्हाल. 2006 मध्ये ती सूरज बडजात्याच्या 'विवाह' चित्रपटात झळकताच तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 'छोटी' च्या भूमिकेमुळे ती खर्‍या अर्थाने लाइमलाइटमध्ये आली.

या चित्रपटानंतर ती रुपेरी पडद्यावर झळकली नाही. शिक्षणावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून तिने अभिनयातून ब्रेक घेतला.  मुंबईमध्ये राहून अमृताने मुंबई यूनिव्हर्सिटीमधून कॉमर्स आणि बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री पूण केली आहे.सोशल मीडियावर अमृता खुप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपले स्टायलिश फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 

अमृता पली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग झाली आहे. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

टॅग्स :शाहिद कपूरअमृता राव