Join us

'बाहुबली'मधील प्रभासचा दमदार लूक असलेला पोस्टर रिलीज

By admin | Updated: October 22, 2016 19:52 IST

बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये मुख्य भुमिकेत असलेल्या प्रभासचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी चित्रपटाचा लोगो रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर चाहते आतुरतेने पहिल्या पोस्टरची वाट पाहत होते. पोस्टरमध्ये मुख्य भुमिकेत असलेल्या प्रभासचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. यानंतर मोशन पोस्टरही रिलीज करण्यात येणार आहे.
 
 
 
(बाहुबलीची रिलीज होण्याआधीच 350 कोटींची कमाई)
(बहुचर्चित सिनेमा 'बाहुबली 2'चा लोगो रिलीज)
 
'बाहुबली-दी कनक्ल्युझन' हा सुपरहिट 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबलीचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. याचदिवशी चाहत्यांना अखेर कटप्पाने बाहुबलीला का मारले?, या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. 
 
बाहुबली हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातल जोरदार कमाई केली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ५० कोटींचा गल्ला जमवला होता. अर्का मिडिया वर्क्‍सच्या बॅनरखाली बाहुबली -२ या चित्रपटाची निर्मिती होणार असून यामध्ये अभिनेता प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस.राजमौली करणार आहेत. 
 
 
दरम्यान, 'बाहुबली-दी कनक्ल्युझन' या सिनेमाने रिलीजआधीच 350 कोटींची कमाई केली आहे. वितरण हक्कांमधून कोटींची कमाई करत हा सिनेमा रिलीजपूर्वीच सुपरहिट झाला आहे.