‘झाँसी की रानी’, ‘बुद्धा’, ‘महाभारत’ यांसारख्या सिरियल्समधून राजाची भूमिका अगदी प्रभावीपणे पार पाडणारा समीर धर्माधिकारी पुन्हा एकदा आपले राजेपण अबाधित राखत ‘अशोका’ या मालिकेत सम्राट बिंदुसारची भूमिका साकारणार आहे. गंगाधर रावपासून शांतनूपर्यंतच्या सर्व भूमिकांपैकी अशोकातील ही भूमिका पूर्णत: वेगळी आणि काही प्रमाणात आव्हानात्मक आहे. या भूमिकेबद्दल सांगताना ‘राजाची पदवी ही भोग नाही तर ती कर्तव्य आहे,’ असे समीर म्हणतो.
समीर धर्माधिकारीचे राजेपण अबाधित
By admin | Updated: January 31, 2015 04:50 IST