Join us  

‘सैराट’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

By admin | Published: May 05, 2016 3:35 AM

‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फार चर्चेत होता. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या.

‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फार चर्चेत होता. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, आठवडाभराची तिकिटे बुक झाली होती. ही परिस्थिती फक्त पुणे-मुंबईपुरतीच मर्यादित नव्हती, तर राज्यभरात सैराटला हाच रिस्पॉन्स मिळत होता. अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणूसही आज सैराट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर जात आहे. सैराटचे पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन् या सिनेमाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सैराट महाराष्ट्रात ९८० ते १,२०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४.२३ करोड, तर दुसऱ्या दिवशी ५.१० करोड अन् तिसऱ्या दिवशी ६.५० करोड व चौथ्या दिवशी ३ करोड, असे तीन ते चार दिवसांचेच कलेक्शन जवळपास १२ ते १५ करोडपर्यंत जाणारे आहे. सैराटची ही घोडदौड पाहता, आतापर्यंतचे मराठी इंडस्ट्रीतील सर्र्व रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. तरुणांवर सैराटची झिंग एवढी चढली आहे, की थिएटरमध्ये पुन:पुन्हा हा चित्रपट पाहिला जात आहे.