Join us  

सयंतानी घोषने या कारणामुळे स्वीकारली कर्णसंगिनी ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 1970 6:03 AM

कुंतीची व्यक्तिरेखा साकारण्यास सयंतानी प्रचंड उत्सुक आहे. चार वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिकेत तिने सत्यवतीची भूमिका रंगविली होती.

नागिन, मेरी माँ, इतना करो ना मुझे प्यार, संतोषी माँ आणि नामकरण यासारख्या मालिकांमधील आपल्या अप्रतिम अदाकारीने प्रेक्षकांवर आपली छाप टाकणारी अभिनेत्री सायंतिनी घोष आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ मालिकेत कुंतीची भूमिका साकारणार आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ मालिकेत कुंतीची भूमिका साकारणारी सयंतानी घोष सांगते की, बरेचसे कलाकार पौराणिक मालिकांमध्ये भूमिका रंगविण्यास तयार नसतात; कारण त्यांना असे वाटते की त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. पण मी अशा भूमिका साकारण्यास नेहमीच तयार असते. कारण मला गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा साकारण्यास फार आवडतात. केवळ कथानक मला उत्तेजित करणारं असलं पाहिजे. आतापर्यंत मी ज्या पौराणिक मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या, त्या रंजक होत्या. या मालिकांमध्ये भूमिका रंगविताना कलाकारांसाठी त्यातील वेशभूषा, संवाद, नेपथ्य वगैरे ही आव्हानं होती; पण प्रत्येक गटातील मालिकांची स्वत:ची अशी काही ना काही आव्हानं असतातच. पण नेहमीच्या मालिकांपेक्षा त्यातील वातावरण अगदी वेगळं असतं, त्यामुळे उलट मला त्या आवडतात. त्यांच्यामुळे एक नावीन्याची झुळूक येते. त्यांचं स्वत:चं असं विश्व असतं.” 

कुंतीची व्यक्तिरेखा साकारण्यास सयंतानी प्रचंड उत्सुक आहे. चार वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ मालिकेत तिने सत्यवतीची भूमिका रंगविली होती. आपल्याला सतत काम करण्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसल्याचे कबूल करताना ती सांगते की, मला सुट्टी घ्यायला आवडत नाही. मी अखेरची सुट्टी घेतली होती, त्यास आता नऊ वर्षे झाली. त्यावेळी मी १० महिने कामाशिवाय होती. वर्षभर व्यग्र ठेवण्याइतक्या भूमिका मला मिळतात, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला काम करायलाच आवडतं. गेली १५ वर्षं एक अभिनेत्री म्हणून सक्रिय राहिल्यावर मी स्वत:ला एक अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केलं आहे, असं म्हणायला हरकत नसावी. विशिष्ट वयानंतर आणि विशिष्ट अनुभवानंतर तुम्हाला तुमच्यातील अभिनेत्रीला आणि कलाकाराला आव्हान देणाऱ्या भूमिका हव्याशा वाटू लागतात. त्याद्वारे तुम्ही तुमच्या कामगिरीचा आलेख मांडू शकता. मलाही अशा नवनव्या आणि अधिक आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या आहेत. विशेषत: माझ्या ‘नामकरण’मधील भूमिकेबद्दल माझ्यावर प्रशंसा आणि कौतुकाचा जो वर्षाव झाला आणि त्या भूमिकेवर प्रेक्षकांनी जे प्रेम केलं, त्याबद्दल मी समाधानी आहे. माझ्यावर विसंबून राहता येईल आणि विश्वास टाकता येईल, अशी मी अभिनेत्री आहे, हा या क्षेत्रातील लोकांना माझ्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे मी खुश आहे.”

टॅग्स :कर्णसंगिनी