Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून पूनम पांडेला करावे लागले सीक्रेट मॅरेज, मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत घेतले साथ फेरे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 22:05 IST

लग्नानंतर पूनमने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आणि लग्न झाल्याची माहिती दिली. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने असं गुपचूप लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे.

हॉट फोटोमुळे कायम चर्चेत असणारी सेक्सी पूनम पांडेने पुन्हा एकदा सा-यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांसह गुड न्युज शेअर केल्याचे समोर येताच सारेच आवाक झाले. लग्नानंतर पूनमने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आणि लग्न झाल्याची माहिती दिली. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने असं गुपचूप लग्न का केलं यामागचं कारण सांगितलं आहे. “कोरोनामुळे सगळ्याच गोष्टीत खबरदारी पाळली जात आहे. भव्य स्वरूपात होणारे लग्न सोहळे देखील आता मोजक्याच लोकांची उपस्थित पार पडत आहे.  त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही देखील नियमांचे उल्लंघन न करता. घरातच गुपचूप लग्न केले. 

 

मोजकेच कुटुंबीय आमच्या आनंदात सहभागी झाले होते. लग्नाचा जास्त गाजावाजा न करता आम्ही आमचा आनंद कुटुंबियासोबत शेअर करत त्यांच्या आशिर्वादाने आमच्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटोही  तिने शेअर केले आहेत. ज्यात ती नववधूच्या ड्रेसमध्ये अधिक सुंदर दिसत आहे. पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

सॅमने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत, ज्यात पूनम एका फोटोमध्ये त्याला मेहंदी दाखवताना दिसत आहे. या अवतारात तेजश्रीचं सौंदर्य खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.लग्नाच्या या खास प्रसंगी पूनम आणि सॅमने एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. पूनमने नेव्ही ब्लू कलरचा लेहेंगा घातला  होता तर त्यावर गुलाबी आणि पांढर्‍या भरतकामाची एम्ब्रॉयडरी केली होती. तर सॅमने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. फोटो शेअर करण्याबरोबर अभिनेत्रीने लिहिले की, 'मला पुढील सात जन्म तुमच्याबरोबर घालवायचे आहे'. ज्याबद्दल सॅमनेही भाष्य केले आहे. पूनम आणि तिच्या लग्नाच्या फोटोवर टिप्पणी देताना सॅमने लिहिले की, ‘बिल्कुल मिसेस बॉम्बे'.

टॅग्स :पूनम पांडे