शूटिंगमुळे जखमी झाल्याचे किस्से सेटवर अनेकदा घडत असतात. पण शूटिंगमुळे जखमी होऊन हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ रणवीर सिंहवर आली. संजय लीला भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काम करत असताना रणवीर जोरदार पडला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांनी छोटेसे आॅपरेशन करण्याचा सल्ला दिला. शनिवारी सकाळी हॉस्पिटलमधूनच आपल्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे त्याने टिष्ट्वट करत आपला फोटोही शेअर केला.
रणवीर सिंहचे झाले आॅपरेशन
By admin | Updated: April 4, 2015 23:22 IST