स र्वांनाच आपल्या मनासारखे प्रेम मिळेलच, असे नाही. काहींना प्रेम मिळते तर काही ते मिळविण्यासाठी अखेरपर्यंत धडपडताना दिसतात. काहींसाठी प्रेम मिळवणे हा नशीबाचा खेळच ठरतो. आता रणबीर कपूरचेच पाहा ना! मी पत्त्यांमध्ये आणि प्रेमात कायम कमनशिबी ठरतो, अशी कबुली खुद्द रणबीरनेच दिलीयं. आगामी ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनात व्यस्त असलेल्या रणबीरनेअलीकडे एका कार्यक्रमात ही कबुली दिली. पत्त्यांच्या डावात आणि प्रेमात नशीब तुमच्या सोबत असणे गरजेचे असते. मात्र माझे नशीब याबाबतीत कायम खोटे ठरले. मला या दोन्ही बाबतीत कायम अपयशच आले, असे रणबीरने यावेळी सांगितले. करण जोहर याने दिग्दर्शित केलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या राय बच्चन व अनुष्का शर्मा या दोन अभिनेत्रींसोबत रणबीर रोमान्स करताना दिसणार आहे.
रणबीर म्हणतो, प्रेमात मी भाग्यशाली नाहीच
By admin | Updated: October 22, 2016 02:48 IST