Join us  

रणबीर कपूर व कतरिना कैफचा न्यूड फोटो व्हायरल

By admin | Published: July 05, 2017 3:15 PM

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा ""जग्गा जासू""च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सध्या त्यांचा आगामी सिनेमा ""जग्गा जासू""च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच त्या दोघांचा आश्चर्यचकीत करणारा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दोघंही न्यूड दिसत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला आहे. व्हायरल झालेला हा फोटो ""जग्गा जासूस"" सिनेमातीलच एका सीनदरम्यानचा आहे. यात रणबीर आणि कतरिना कपड्यांशिवाय ऑटोमध्ये बसलेले दिसत आहेत. फोटोमध्ये दोघांच्या चेह-यावरील हावभाव पाहून दोघं कोणत्यातरी अडचणीत अडकल्याचे वाटत आहे. 
 
""जग्गा जासूस"" हा सिनेमा 14 जुलै रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. रणबीर आणि कतरिना यांच्या ब्रेकअपबाबत तर आता सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतरचा हा ""जग्गा जासूस"" हा पहिला सिनेमा. ऐन शुटिंगदरम्यानच दोघांचं ब्रेक अप झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे सिनेमा पूर्ण होणार की नाही, याची भीती निर्माता, दिग्दर्शक यांच्यासहीत दोघांच्या चाहत्यांमध्येही होती. पण खासगी आयुष्यातील वाद करिअरमध्ये आणू न देता दोघांनी सिनेमा पूर्ण केला. 
 
जग्गा जासूसमध्ये रणबीर-कतरिना मुख्य भूमिकेत
 
‘जग्गा जासूस’ या सिनेमात रणबीर कपूर एका 19 वर्षांच्या टीनेजरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे काही शुटिंग यापूर्वीच करण्यात आले आहे. सूत्रांनुसार रणबीर या सिनेमात एका टीनेजरच्या भूमिकेत आहे, तर त्याची को स्टार कतरिना कैफ 22 वर्षांच्या एका तरुणीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमातील दोघांचा लूक भूमिकेप्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. आजवर सारख्याच वयाच्या भूमिका साकारणाऱ्या रणबीर आणि कतरिना या जोडप्याला अशा वेगळ्या भूमिकांत पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे
 
 
 
(रणबीर करणार का आणखी एक बायोपिक?)
दरम्यान, ""जग्गा जासूस सिनेमा रिलीज होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास, वेगळा आणि खूप कठीण होता"", असे रणबीरनं म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग बसू दिग्दर्शित या सिनेमामध्ये रणबीर कपूर एका अशा तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत आहे.