Join us  

पलक तिवारीची सावत्र आई आहे तरी कोण ? श्वेता तिवारीला सोडून राजा चौधरीनं थाटला तिच्यासोबत दुसरा संसार अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 8:02 PM

राजा चौधरी अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी पलक तिवारी आहे. पण 2012 मध्ये श्वेता आणि राजा वेगळे झाले, त्यानंतर राजा चौधरीने 2015 मध्ये श्वेता सूदशी लग्न केले.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)ची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हिने अखेर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातून श्वेताच्या लेकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण, आजही पलकपेक्षा त्याची आई श्वेता तिवारी इंडस्ट्रीत जास्त चर्चेत आहे. श्वेताने जेव्हापासून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हापासून ती सतत चर्चेत असते. श्वेता तिवारी राजा चौधरीसोबतचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते, त्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत दुसरा लग्न केलं तर राजाने श्वेता सूदसोबत दुसरा संसार थाटला. 

श्वेता तिवारीचा अभिनव कोहलीशी नातं कसं आणि आणि तो कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. श्वेता काही काळापूर्वी तिचा दुसरा पती अभिनवपासून विभक्त झाली होती. मुलगा रेयांशबाबत दोघांमधील भांडण कोणापासून लपून राहिलेले नाही. सोशल मीडियावरही त्यांच्यातील भांडणाची चर्चा रंगली आहे. पण, तुम्हाला राजा चौधरीची दुसरी पत्नी श्वेता सूदबद्दल माहिती आहे का? राजा चौधरी यांनी 2015 मध्ये लग्न केले आणि तिच्यासोबतचे त्याचे नातेही फार काळ टिकले नाही.

राजा चौधरीने काही वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती ज्यात त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले होते. या मुलाखतीत राजा चौधरीने सांगितले होते की, श्वेता तिवारीने त्याला घटस्फोट दिला आणि दोघांचे रस्ते वेगळे झाले. त्याचवेळी दुसरी पत्नी श्वेता सूद हिने त्याच्यापासून वेगळे होण्यासाठी पोटगी मागितली होती. पहिल्या पत्नीपासून म्हणजेच टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीपासून वेगळे झाल्यानंतर राजा चौधरीचे नाव श्रद्धा शर्मासोबतही जोडले गेले होते.

श्वेता तिवारीप्रमाणेच श्रद्धा शर्मानेही राजावर मारहाणीचा आरोप केला होता, त्यानंतर अभिनेत्याला तुरुंगात जावे लागले होते. दुसरीकडे, श्रद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या सर्व प्रकारानंतर राजाने 2015 मध्ये श्वेता सूदसोबत लग्न केले, मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. दोघांनी घटस्फोट घेत आपले मार्ग वेगळे केले.  

टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारी