चि त्रपट अभिनेते राज बब्बर लवकरच छोटय़ा पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत. लवकरच सुरू होणा:या ‘पुकार’ या टीव्ही मालिकेत ते अभिनय करताना दिसतील. या टीव्ही मालिकेबाबत ते उत्साहित आहेत. त्याबाबत बोलताना राजबब्बर म्हणाले की, ‘मी खूप भाग्यवान होतो, जेव्हा मी 35 वर्षापूर्वी कॅमे:याचा सामना केला. मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो. कारण माझा प्रवास खूपच शानदार होता. यादरम्यान मला चांगले मित्रही भेटले. माझा हा प्रवास आता संपावा, अशी माझी इच्छा नाही. मला अजूनही जास्त काम करायचे आहे. प्रेक्षकांना माङो काम आवडेल आणि त्यांना ‘पुकार’ हा शोसुद्धा आवडेल, अशी मला आशा आहे. या शोची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे.