Join us  

Raj Babbar : "माझ्यासारखा माणूस ना घर का रहा ना घाट का"; राज बब्बर यांनी राजकारणाबाबत स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:38 AM

Raj Babbar : आपल्या अभिनयापासून ते राजकारणातील कारकिर्दीपर्यंत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणीराज बब्बर आपला नवीन शो हॅप्पी फॅमिली - कंडीशन्स अप्लायमुळे चर्चेत आले आहेत. याच दरम्यान, ते आपली तीन मुलं प्रतीक बब्बर, आर्या बब्बर आणि जुही बब्बर यांच्यासह द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या अभिनयापासून ते राजकारणातील कारकिर्दीपर्यंत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. द कपिल शर्माचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

"लोकांनी मला पैसे देणे बंद केलं"

प्रोमोमध्ये होस्ट कपिल शर्मा राज बब्बर यांना मजेदार प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल शर्मा विचारतो, सर, तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की निर्मात्याने तुमचे पेमेंट थांबवले आहे, पण तुम्ही राजकारणी झाल्यावर तुमचे पैसे द्यायला पोहोचला आहे? या प्रश्नाला उत्तर देताना राज बब्बर म्हणाले, "जेव्हा मी सामाजिक जीवनात गेलो तेव्हा ज्या लोकांना मला पैसे द्यायचे होते त्यांनीही देणे बंद केले, त्यांना वाटले की राज यांना आता पैशांची काय गरज आहे?"

"माझ्यासारखा माणूस ना घर का रहा ना घाट का"

राज बब्बर पुढे म्हणाले, राजकारणाचं खूप चुकीचं इम्प्रेशन झालं आहे, एकदा तुम्ही त्यात गेलात की तुम्ही 100-500 कोटींची व्यक्ती बनता. यानंतर राज बब्बर म्हणतात आमचे काय झाले? माझ्यासारखा माणूस ना घर का रहा ना घाट का. इथून पेमेंट मिळाले नाही आणि तिथून काहीही कमावले नाही. सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, राज बब्बर यांच्या आयुष्यातील काही रोमांचक कथा'. 

विशेष म्हणजे राज बब्बर हे काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. हॅपी फॅमिली - कंडीशन्स अप्लाय या कॉमेडी शोद्वारे त्याने अलीकडेच ओटीटीवर पदार्पण केले आहे. यामध्ये अतुल कुलकर्णी, रत्ना पाठक शाह आणि आयेशा जुल्का हे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राज बब्बरराजकारणकपिल शर्मा