Join us  

राधिका आपटे ठरली 'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By admin | Published: April 22, 2016 3:20 PM

लक्षवेधी अभिनय करणारी गुणी मराठामोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - शोर इन दि सिटी, मांझी: दि माऊंटन मॅन, बदलापूर असे अनेक चित्रपट आणि अहल्या सारख्या शॉर्टफिल्ममधील लक्षवेधी अभिनय करणारी गुणी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिला न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये (आंतरराष्ट्रीय कॅटॅगरीत) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 'मॅडली' या शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट स्टोरीजच्या 'मॅडली' या 20 मिनिटांच्या सेगमेंटमधील फिल्ममध्ये राधिका झळकली आहे. मात्र यातील भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिची दखल घेतली गेली आहे.
'ट्रिबेका' फिल्म फेस्टिव्हलमध्ये एखाद्या भारतीय अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या फिल्म फेस्टिव्हलसाठी जगभरातून हजारो फिल्म्स पाठवल्या जातात, ज्यांचे परीक्षण करणा-या ज्युरींमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा समावेश असतो.
 
दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता रितेश देशमुख, अर्जुन कपूर यांनी या पुरस्कारसाठी राधिकाचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.